पुणे : पोर्श कार अपघाताने दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आरोपी वेदांतसह त्याचे वडीलासह मित्रांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातच आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार या प्रकरणाची चौकशी करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप करत त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलीय. त्यासाठी धंगेकरांनी आज पोलिस आयुक्तलयासमोर ठिय्या आंदोलन देखील केलं. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “ही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात ३०४ अ गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेचे गांभीर्य पाहाता त्यानंतर ३०४ हे कलम वाढवण्यात आलं. त्याच दिवशी आम्ही बाल न्याय मंडळाकडे त्या आरोपीला सज्ञान म्हणून ट्रिट करण्यात यावं, अशी मागणी केली होती. मात्र, तेव्हा आमची मागणी मान्य झाली नाही.
त्यानंतर पुढच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच आरोपी मुलाच्या वडीलांवर आणि पब मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळाकडे मागणी केली होती, त्यानंतर आमची मागणी मान्य झाली आणि आरोपीची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
हेही वाचा…“५० हजार कोटींचा गेल प्रकल्पही गेला,” अंबादास दानवेंचा केंद्रावर हल्लाबोल
आरोपीला सज्ञान म्हणून ग्राह्य धरण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे प्रोसेजर सुरू आहे. आरोपीच्या वडीलांची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा न्यायालयात दाखल करणार आहोत. या सर्व प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे सुरु आहे. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? याचा तपास सुरु आहे. अशा प्रकारे तपास करून आम्ही लवकरात लवकर न्याय देण्याचा आणि आरोपींना शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात न्यायालयात योग्य ती बाजू मांडण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत.
आरोपीच्या पालकाने अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याचाही तपास सुरू असून या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले असा काही आरोप होत आहे. मात्र, आम्ही यावर सांगतो की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याच्या मार्गावर पोलीस चालत आहेत. यामध्ये दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झालं असं म्हणणं योग्य नाही. आता सुरुवातीला ३०४ कलम का लावण्यात आलं नाही, तसेच आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का? याबाबत चौकशी सुरू आहे.
हेही वाचा…“फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,” बिल्डपुत्राचा माज, अपघातानंतर रॅपमधून केली शिवीगाळ
या घटनेतील आरोपीचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत. सुरुवातीला ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यामध्ये आमचे फॉरेन्शिक लॅबला आवाहन आहे की, दोन्ही ब्लड सॅपल आरोपीचे आहेत की नाही, याची खात्री करावी. आरोपी मद्य पित असतानाचे सीसीटीव्ही आमच्याकडे आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु आहेत.
येरवडा पोलीस ठाण्यात काय घडलं? याचा तपास सुरु आहे. तसेच आपल्या या कृत्यामुळे अपघात होईल, याची जाणीव आरोपीला होती. या प्रकरणातील एका एका घटनेचा बारकाईने तपास पोलीस करत आहेत. या घटनेत गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला ही बाब आमच्या चौकशीत समोर आली आहे.
पोर्श या गाडीमध्ये अपघात घडला तेव्हा एकूण चार लोक होते. त्यातील एकजण गाडी चालवत होता. अजून दोन मुले होते आणि एक ड्रायव्हर होता. तसेच ज्या पबमध्ये पार्टी झाली, त्यावेळी आणखी सात ते आठ लोक त्याठिकाणी होते. यातील ड्रायव्हरचं विधान महत्वाचं असून ते ग्राह्य धरण्यात येईल.”
READ ALSO :
हेही वाचा…“पोलिस कर्मचाऱ्याचा पबमधला फोटो ट्विट करत धंगेकरांचा पोलिसांवर निशाणा,” कारवाई करा अन्यथा…
हेही वाचा…गावाच्या पारावर राजकारणासाठी गेला जीव, कोण जिंकणार ? वाद झाला अन्…
हेही वाचा…“पाच वर्षात एकही काम नाही, राणांचा पराभव निश्चित”, अनंत अडसुळांचा मोठा दावा
हेही वाचा..जनतेला दुष्काळाचे चटके, मात्र ‘या’ ५ पालकमंत्र्यांना दुष्काळाची चिंता नाही ?