नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते असलेल्या विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी आणि पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांच्याकडे देखील भाजपकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
BJP National President Shri @JPNadda has appointed Shri @byadavbjp as the party's election incharge & Shri @mla_sudhakar, Shri @ShelarAshish, Shri @pradipsinhbjp & Shri Satish Reddy as election co-incharges for the upcoming Greater Hyderabad Municipal Corporation (GHMC) election. pic.twitter.com/El6fdvBJqO
— BJP (@BJP4India) November 15, 2020
आशिष शेलार यांची आगामी ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही नियुक्ती केली आहे.
आशिष शेलार यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून, तर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.