IMPIMP
Assembly preparation started, Uddhav Thackeray's meeting suggestions Assembly preparation started, Uddhav Thackeray's meeting suggestions

विधानसभेच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सूचना

मुंबई :  लोकसभा निवडणुकीनंतर आता ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील संपर्कप्रमुखांची एक बैठक बोलवली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात येत्या ०७ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना ठाकरेंनी संपर्कप्रमुखांना केल्या आहेत.

हेही वाचा..अजित पवार गटाकडून राज्यसभेवर सुनेत्राताई पवार, की पार्थ पवार, की तिसरा कोणीतरी?

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वात जास्त २१ उमेदवार उभे केले होते. मात्र त्यातील फक्त ०७ उमेदवारांना विजय मिळवता आला. आता याचाच आढावा घेण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा आजच्या बैठकीतून ठाकरेंनी घेतला. यातच आपल्याला कोणता मतदारसंघ अनुकूल आहे ?  यासंदर्भात ठाकरेंनी बैठकीत चर्चा केली. तर आपल्याला अनुकूल नसलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला तो मतदारसंघ द्यावा ? याचीही चर्चा यावेळी करण्यात आली.

हेही वाचा…मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्… 

यातच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढली तर राज्यातील सध्याचं चित्र काय असणार ? महाविकास आघाडीत लढली तर पक्षाला किती जागा मिळणार ? यासंदर्भातील अहवाल देखील ठाकरेंनी येत्या सात दिवसात मागितला आहे.

याचसोबत लोकसभा निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो ? याचा तपशील मागत सरकार रोजगार देण्यात कमी पडलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे. महागाई वाढली आहे. हे मुद्दे लोकांना पटवून द्या. असं आवाहन देखील त्यांनी केलंय. यातच २५ वर्षांनी जनतेच्या प्रश्नासाठई आक्रमक होणारी शिवसेना आता दाखवून द्या. असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

READ ALSO :

हेही वाचा..महायुतीत धाकधुक वाढली..! भाजप विधानसभेला एकटंच लढणार?

हेही वाचा..“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पं नाही”, राष्ट्रवादीतील अंतर्गत शितयुद्ध चव्हाट्यावर

हेही वाचा..शपथविधी झाला, खातेवाटपही झालं, आता पहिलं अधिवेशन २४ जूनपासून.. वादळी ठरणार ?

हेही वाचा..“मोदी है तो मुनकीन है, मोदी की गॅरंटी”, असं वातावरण तयार केलं, पण घडलं काय ?” शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

हेही वाचा…“कोकण आणि नाशिकबाबत समझोता झालाय”, विधान परिषदेच्या जागांचा घोळ ठाकरेंनी निकाली काढला