IMPIMP
At that time, Thackeray wanted to break the government and go with the BJP At that time, Thackeray wanted to break the government and go with the BJP

“त्यावेळी ठाकरेंना वाटतं होतं की सरकार मोडावं अन् भाजपसोबत जावं”, तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट

पुणे :  महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं. २०२१ मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी मोदींची विकासकामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या मनात सरकारबद्दल पुनरविचार सुरू होता. त्यांना वाटतं होते की हे सरकार मोडावं आणि भाजपसोबत जावे, असे संजय राऊतांनी सांगितले असल्याचे आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. यातच सुनील तटकरे यांनी मागील सरकारच्या काळातील घटनांवर देखील भाष्य केलं.

हेही वाचा..“आजची मोदींची पावलं ही हुकूमशाहीकडे जाताहेत”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल 

सुनील तटकरे म्हणाले की,  २०१४ साली विधानसभा निवडणुकीचे निकाल पुर्ण यायचे बाकी होती. त्यावेळी भाजपला ११५ जागा मिळणार असं स्पष्ट झालं होतं. त्यावेळी शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. होती. त्या बैठकीला माझ्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी भाजपला बाहेरून पाठिंबा द्यावा असे आम्हाला सांगण्यात आले. परंतु ही गोष्ट ज्यावेळी बाहेर गेली. त्यावेळी कॉंग्रेसची विश्वासाहर्ता खराब झाल्याने अजितदादांनी पहाटे नाही तर सकाळी आठ वाजता शपथ घेतली होती.

हेही वाचा…“आपण कुठल्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये”, ‘त्या’ विधानावर दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण 

राष्ट्रवादीकडे भाजपने पाठिंबा मागितल्याचे माझ्या ऐकण्यात कुठेचं आलं नाही. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन त्यात मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर २०१६ लाच आपण भाजप पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं, अशी चर्चा सुरू झाली. त्यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यात जागा वाटपाची चर्चा देखील झाली होती. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा..घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा संबंध नाहक भाजपने ठाकरेंशी लावला, भाजपकडून किळसवाण राजकारण सुरू

हेही वाचा..घसरलेल्या टक्क्याचा फटका कोणाला ? मोहोळ, आढळराव, बारणे, वाघेरे यांचे भवितव्य सील 

हेही वाचा..“अब की बार चारसो पार ही घोषणा मोदींच्या अंगलट, केंद्रात सत्ताबद्दल”, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा 

हेही वाचा..पुण्यात 5 वाजेपर्यंत ४४.९० टक्के मतदान, सर्वात जास्त ‘कसबा पेठेत’ मतदान 

हेही वाचा…“अंडे न देणाऱ्या खुडूक कोंबडीला कोण स्वीकारणार ?” सदाशिव लोखंडेंची वाकचौरेंवर बोचरी टिका