मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकार व मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर अचानक वातावरण तापलं आणि मुंबई महापालिकेने कंगनाचे ऑफिस अनधिकृत आहे असे म्हणत त्यावर हातोडा चालवला.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या फोटोला जोडे मारणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. ‘कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याकडून आलेल्या धमकीच्या अनुषंगानं भाजपनं हा टोला हाणला आहे.
‘मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांडव्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता,’ असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 9, 2020
देवेंद्र फडणवीसांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत बोलताना त्यांना टोला हाणला होता. ‘जी कामं करायची ती आम्ही दिवसाढवळ्या करतो. रात्रीच्या अंधारात नाही,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही भातखळकर यांनी समाचार घेतला आहे. ‘पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांतसिंहचं शवविच्छेदन रात्रीच्या अंधारातच झालं,’ असा दावा भातखळकर यांनी केला आहे.