मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते’, असा गौप्यस्फोट केला होता यानंतर त्यांच्यावर टीका झाली मात्र यावर मी असे बोलोलोच नव्हतो असे स्पष्टीकरण देशमुखांनी दिल्यानंतर भाजपने त्यांना टोला लगावला आहे.
यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुखांवर टीका केली आहे ‘ यु टर्नचा वाण पण गन लागला आहे ‘ अशा शब्दात भातखालकरांनी टोला लगावला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात अनौपचारिक भेट देशमुख यांनी दिली. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा इन्कार करताना देशमुख म्हणाले, ‘एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे. मी असं कुठेही म्हटलो नाही. या मुलाखतीचा व्हिडfओ यूट्युबवर उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला तर वस्तुस्थिती लक्षात येईल.’
दरम्यान ‘काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे. जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही’, असे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केली होते यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती.
Read Also :