IMPIMP
Bachu Kadu said that if there is no agriculture minister in the state, we are here, expand the cabinet later Bachu Kadu said that if there is no agriculture minister in the state, we are here, expand the cabinet later

“राज्यात कृषीमंत्री नसले तर आम्ही इथे आहोत, मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा”

मुंबई : महाराष्ट्रात एव्हाना देशात मागील सात ते आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथील पुराच्या पाण्याची पाहणी केली होती. तसेच राज्यात अजून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं नाही. यावरून शेतकऱ्यांच्या पीकांची नुकसानीबाबत कसे निर्णय घेणार तो पण सवाल उपस्थित केला जात आहे.

“धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो की, एकही बंडखोर आमदार निवडून येणार नाही” 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेले आमदार बच्चू कडू यांनी याबाबत भाष्य केलं आहे.  “राज्यात कृषीमंत्री नसले तर आम्ही इथे आहोत. नुकसानीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आढावा घेत आहेत. एकाच दिवशी मोठा पाऊस आल्यानं ही स्थिती झाली आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा.” अशी मागणी त्यांनी केली आहे.

“भेट शिवतीर्थ, दादरला झाली अन् चक्क धुर बारामतीवरून निघाला” 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मंत्रिमंडळाबाबत राज्य सरकारवर टिका केली आहे. सध्या दोघच राज्याचे मालक असून तेच सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देखील यावरून राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.

“माझी काय हकालपट्टी करणार, मीच सेनेतून बाहेर पडलो”; विजय शिवतारे

दरम्यान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची शनिवारी बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतराच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. यावरून आता दोन मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये नामंतराबाबत जे निर्णय घेतले हेच काही  दिवसांपुर्वी माविआ सरकारने घेतले होते. माविआ अल्पमतातील सरकारचे निर्णय असं आपण जरी म्हणाला तरी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तुम्हा दोघांचे सरकार तरी टिकेल का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारला केला आहे.

Read also