IMPIMP
Bajrang Sonwane of Beed, who will stay with Sharad Pawar till he is alive, replied to Mitkari Bajrang Sonwane of Beed, who will stay with Sharad Pawar till he is alive, replied to Mitkari

“जीवंत असेपर्यंत शरद पवारांसोबत राहणार”, बीडच्या बजरंग सोनवणेंनी मिटकरींना दिलं प्रत्युत्तर

बीड : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. त्यातील रावेर आणि सातारा सोडता सर्वच म्हणजे ८ खासदार निवडून आले. यातील बीडमधून बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव केला. यातच आता बीडच्या बप्पाचा दादांना फोन, मोठ्या मनाचा दादा असे म्हणत अजित पवार गटातील अमोल मिटकरी यांनी ट्विट केले. त्यावर आता बजरंग सोनवणे यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय.

हेही वाचा…“शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल” 

खासदार बजरंग सोनवणे यांचे आमदार अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो ? ते असा संभ्रम का पसरवत आहेत ? हे त्यांनाच विचारायला हवं. ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्युज का करत आहे ? राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक विचार असतात. ते तुम्ही राजकारणात आणताय. हे मिटकरी अतिशय चुकीचं करत आहेत.

हेही वाचा…“तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील”, रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट 

मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय? मला माहित नाही, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या उष्टीला हात घालावा, ही माझी विनंती  आहे. मी जिवंत असेपर्यंत मी शरद पवार साहेबांसोबतच राहणार असेही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.

READ ALSO :

हेही वाचा..मुरलीधर मोहोळांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार 

हेही वाचा..विधानसभेत महायुतीसमोर धोक्याची घंटा..! अन्यथा, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार ? 

हेही वाचा…“उद्या मी आयोध्येला गेलो तर रामाचा सन्मान ठेवीन, परंतु मोदींनी…”,शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं 

हेही वाचा..“हा भटकता आत्मा तुम्हाला आता सोडणार नाही”, शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं 

हेही वाचा…“नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं,” मोदींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी कबुली