मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत काळजी घेण्यासंबंधात जनतेला मार्गदर्शन केले. तसेच शिवसेनेवर काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपांचा देखील समाचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्याची भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी खिल्ली उडवली आहे.
मुख्यमंत्री बोलताना जेवणाचे पदार्थ छोट्या छोट्या भांड्यात जेवायला घ्या असे म्हंटले होते. त्यावर मावळमधील भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढत त्यांच्याच विधानाची खिल्ली उडवली आहे. लहान मुलांच्या खेळण्यातील भांड्यांचा फोटो ट्विट करत, एवढी छोटी भांडी चालतील का ? असा सवाल भेगडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
जेवणाचे पदार्थ लहान लहान भांड्यात घ्या – माननीय मुख्यमंत्री
एवढी छोटी भांडी चालतील का??@CMOMaharashtra @BJP4Maharashtra @TheRSS_Piyussh @Yogesh_Gogawale pic.twitter.com/q78qRMB2si
— Bala Bhegade (@BalaBhegade) September 14, 2020
Read Also
मराठा आरक्षणावरून मावळ भाजप कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेदhttps://t.co/PHpgYdZi2S@BalaBhegade @BJP4PuneCity @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 14, 2020