मुंबई : दिपावलीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्ते विजय म्हस्के यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विजय म्हस्के यांच्या इच्छाशक्तीचे कौतुक केले.
आयुष्यात काय कमावलं? असं जेव्हा कोणी विचारतं तेव्हा विजय म्हस्के सारख्या कार्यकर्त्याचं नाव आपसुकच तोंडी येते, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी दिव्यांग म्हस्के यांच्या कामाचे कौतुक केले. म्हस्के हे स्वतः दिव्यांग असले तरी ते महाराष्ट्रात दिव्यांगासाठी काम करतात.
आयुष्यात काय कमावलं? असं जेव्हा कोणी विचारतं तेव्हा विजय म्हस्के सारख्या कार्यकर्त्याचं नाव आपसुकच तोंडी येतं. स्वतः अपंग असूनही तो आज अपंगांसाठी उत्तम काम करतोय. विजय सारखे कार्यकर्ते पदरी असणं हेच माझं भाग्य आणि आजवर कमावलेली आयुष्याची खरी शिदोरी!:- प्रदेशाध्यक्ष ना.@bb_thorat pic.twitter.com/4XiZ5U84uY
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 15, 2020
स्वतः अपंग असूनही म्हस्के हे इतर अपगांसाठी उत्तम काम करत आहेत, विजय सारखे कार्यकर्ते पदरी असणं हेच माझं भाग्य आणि आजवर कमावलेली आयुष्याची खरी शिदोरी असल्याचे यावेळी थोरात म्हणाले.