वांद्रे पश्चिम येथील शेरली राजन रोड वर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून झालेल्या विचित्र दुर्घटनेत जवळपास 16 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी आहेत. मध्यरात्रीपासून आतापर्यंत ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरुच आहे.
#UPDATE: The building that collapsed in Bandra's Sherley Rajan road was empty, however, its debris fell on other structures nearby. One person rescued; rescue operation underway. #Maharashtra https://t.co/N1zCB1iR1f pic.twitter.com/lIz7bRDJyF
— ANI (@ANI) August 17, 2020
इमारत धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती. सध्या जखमींवर लीलावती आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी दुर्घटनाग्रस्तांना शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे.
माझ्या मतदार संघातील खार येथील कल्पना ही इमारत आज कोसळून दुर्घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मीही तातडीने जाऊन पाहणी केली. बचाव कार्य अद्याप सुरु असून नुकसान झालेल्या व दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत करावी. @MhatreViru pic.twitter.com/Zq5DgbcBHB
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 17, 2020
आशिष शेलार यांनी ट्विट केले की, माझ्या मतदार संघातील खार येथील कल्पना ही इमारत कोसळून दुर्घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मीही तातडीने जाऊन पाहणी केली. बचाव कार्य अद्याप सुरु असून नुकसान झालेल्या आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत करावी.