IMPIMP
Banners as 'Future MP' started before Pune results Banners as 'Future MP' started before Pune results

शुभेच्छा देण्याची लयच घाई..! निकालाच्या आधीच लागले ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर्स

पुणे : अलिकडेच राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदानाचा निकाल येत्या ०४ जुन रोजी लागणार आहे. परंतु त्याआधीच शुभेच्छा देणारे बॅनर पुण्यात लागले आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून, पेढे वाटून आधीच आनंद साजरा केला जात आहे.

हेही वाचा..“नवमतदारांचं मत आम्हालाच,’ गुलाबराव पाटलांनी जळगावात ठोकला मोठा दावा 

आज पुण्यातील सारसबाग येथे महाविकास आघाडी तसेच इंडिया फ्रंडच्या उमेदवारांचे बॅनर लावण्यात आले आहे. यामध्ये पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे, तसेच बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकले आहे. यावर गुलाल आमचाच, भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा..“देशात मोदींची लाट नाही, मग मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी निवडणूक का केली ?” देवेंद्र फडणवीस म्हणाले…

दरम्यान, याआधी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे देखील बॅनर पुण्यात झळकले होते. भाजप तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचे भावी खासदार असलेले बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.

READ ALSO :

हेही वाचा…अखेर प्रफुल्ल पटेल विरोधकांसमोर झुकले, मोदींना जिरेटोप घालणं पटेलांच्या आलं अंगलट

हेही वाचा…मोदींच्या सभेसाठी शरद पवारांचं नाव झाकलं, शरद पवार गटाने मोदींना डिवचलं 

हेही वाचा…“शिंदे, अन् अजितदादांनी कांद्याची माळ घालून मोदींचे स्वागत करावे” 

हेही वाचा…अजित पवार, शिंदे गटाला किती जागा मिळणार ? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला 

हेही वाचा…अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर