IMPIMP
eknath shinde vs bhavna gavli eknath shinde vs bhavna gavli

“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने पाच जणांची यादी जाहीर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून दोन जणांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून दोन तर कॉंग्रेस आणि ठाकरे गटाकडून प्रत्येकी एका संधी देण्यात आलीय. तर शेकापच्या जयंत पाटलांनी देखील महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा..साहेब..! तुमचा शब्द खरा ठरवला.. विजयी किशोर दराडेंनी मुख्यमंत्र्यांना केला फोन

विधानसभा सदस्यसंख्याबळानुसार भाजपचे १०३ शिवसेना शिंदे गटाचे ३७, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ आमदार असे एकूण २०१ आमदारांचं पाठबळ महायुतीकडे आहे. यातच शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीत तिकीट डावलण्यात आलेल्या माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देण्यात आली आहे. यातच आता भावना गवळी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा…विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून दोन माजी खासदारांना संधी, तर ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी

त्या म्हणाल्या की, विधान परिषदेचे सभागृह माझ्यासाठी नवीन आहे. लोकसभेवर अनेकदा निवडून गेले. त्यामुळे लोकसभेचे सभागृह अनेक वर्ष पाहिलेले आहे. विधान परिषद नवीन जरी असली तरी सर्वांच्या सहकार्याने गाजवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी उमेदवारी दिली आहे.

मागच्या वेळेस लोकसभेला उमेदवारी मिळू शकली नाही. त्याची विविध कारणे असतील. काही कारणे असतील असे राजकारणामध्ये असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. लाडकी बहिण योजना सरकारने राबवली. तसे म्हणेन की मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण आहे. अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.

READ ALSO :

हेही वाचा..मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

हेही वाचा…“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल 

हेही वाचा..पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..” 

हेही वाचा…अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

हेही वाचा..“मैं समुंदर हूॅं लौटकर वापस जरूर आऊंगा”, माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं ?

Leave a Reply