IMPIMP
Bhujbal has already explained everything, don't go on till the end of seat allocation in the Vidhan Sabha Bhujbal has already explained everything, don't go on till the end of seat allocation in the Vidhan Sabha

“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पार पडल्यानंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. यातच आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचा २५ वा वर्धापन सोहळा पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळांनी महायुतीला धमकीवजा कडक इशारा दिला. लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. विधानसभेला शिंदेंना जितक्या जागा मिळतील. तितक्या जागा आपपल्या देखील मिळायला हव्यात. असं भुजबळांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे.

हेही वाचा…“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं 

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आम्हाला कमीत कमी ८० जागा मिळाल्या पाहिजेत असं मी सुरूवातीला म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच माझ्याविरोधात हे असं नाही, बोलायचं वैगेरे बरं नाही बोलतं. पण विधानसभेच्या जागांचा लवकर निपटारा करायला हवा. जागावाटप करून घ्या. त्यानंतर उमेदवारांचे काय ते ठरवा. भाजप हा मोठा भाऊ आहे ते मान्य पण आमचेही ४० आमदार आहेत. शिंदे कडेही तेवढे आहेत. त्यामुळे त्यांना जितक्या जागा मिळणार. तितक्या आम्हालासुद्धा मिळायला हव्यात. यावेळी शिंदेंचे जास्त खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना जास्त जागा असं करू नका. सगळ्यांनी काम करायलं हवं. असेही ते म्हणाले.

हेही वाचा..Ground Report : पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा मुंबईतील ‘मातोश्री’वर दबदबा ! दिग्गज नेते ‘मशाल’हातात घेण्याच्या तयारीत 

दरम्यान, विधानसभेला सगळ्यांना उमेदवारी द्या. सर्व समाज घटकांचा विचार करून उमेदवारी द्यावी लागेल. दलित, आदिवासी यांच्या राखीव जागा आहेत. त्यांचा प्रश्न ९९ टक्के प्रश्न सुटला आहे. परंतु बाकीचे जे भटके, विमुक्त, ओबीसी आहेत. त्यांनाही आपल्यासोबत ठेवावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. दलिती, मुस्मिल, आदिवासी, भटके विमुक्त हे सगळे मतदार आपल्यासोबत येतईल असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागेल. असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.

READ ALSO :

हेही वाचा..“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं 

हेही वाचा…“राज्यात शिंदे-ठाकरे विधानसभेला पुन्हा एकत्र येणार” ? शिंदेंच्या नेत्यांनी दिला मोठा दुजोरा 

हेही वाचा..शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले 

हेही वाचा..“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर 

हेही वाचा..“सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा”, अजित पवार गटाचा ठराव मंजूर