IMPIMP
Big blow to Ajit Pawar's group, fire brand leader Rupali Patil will give party a lot Big blow to Ajit Pawar's group, fire brand leader Rupali Patil will give party a lot

अजित पवार गटाला मोठा धक्का, फायर ब्रॅंड नेत्या रूपाली पाटील पक्षाला देणार सोडचिठ्ठी ?

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार सध्या अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील सध्या पक्ष सोडण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात योग्य संधी मिळत नसल्यानं नाराज होऊन त्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आलीय. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं भाष्य केलंय.

हेही वाचा..महायुतीत धाकधुक वाढली..! भाजप विधानसभेला एकटंच लढणार?

मनसेला सोडचिठ्ठी देत रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. त्यानंतर पक्षात फुट पडली आणि रूपाली पाटील यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. यातच अजित पवार गटात आता योग्य संधी मिळत नसल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्या पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिलीय.

हेही वाचा..“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पं नाही”, राष्ट्रवादीतील अंतर्गत शितयुद्ध चव्हाट्यावर

दरम्यान, रूपाली पाटील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. यावर सुषमा अंधारे यांनी मोठं भाष्य केलंय. त्या म्हणाल्या की, निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाई कार्यकर्ता. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार ? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार ? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ असं अंधारे यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…“सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज,” अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

हेही वाचा..“भाजपने अजितदादांची ‘ब्रँड व्हॅल्यू’ संपवली हे मात्र वास्तव” 

हेही वाचा..“अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती,”? भाजपला आत्मविश्वास नडला, संघाने भाजपला दाखवला आरसा 

हेही वाचा..“सत्ता डोक्यात गेली अन् पाय जमीनीवर राहिले नाही तर..”, शरद पवारांनी दिला कडक इशारा 

हेही वाचा…विधानसभेच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सूचना