IMPIMP

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीचा एकूण निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे यांना 30 हजार 802 मतं पडली आहेत. तर काँग्रेसच्या अभय पाटील दुसऱ्या स्थानी असून त्यांना 35 हजार 290 मत पडली आहेत. यातच वंचित आघाडी प्रकाश अंबेडकर 22 हजार 789 यांना इतकी मत पडली असून ते सध्या पिछाडीवर आहेत.

दुसऱ्या फेरीअंति काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील 4 हजार 488 मतांनी आघाडी घेतली आहे. रायगड मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे ३ हजार ७३७ मतांनी आघाडी घेतली असून सुनील तटकरे यांना आतापर्यंत ५५,१०० मतं तर विरोधात असलेले अनंत गीते ५१,३६३ मतं पडली आहेत.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले यांना मते 9983 मत पडली असुन शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना 12626 मत पडली आहेत. सध्या शशिकांत शिंदे 2643 मतांनी आघाडीवर आहेत.