IMPIMP
Big decision of Pune court in Manoj Jarange's arrest warrant case Big decision of Pune court in Manoj Jarange's arrest warrant case

मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच आज मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा कोर्टात दाखल झाले आहेत. एका प्रकरणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉंरट जारी केले होते. त्यानंतर त्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली.

हेही वाचा..“..तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील”, पुणे अपघाताबाबत मोठी अपडेट समोर 

२०१३ मध्ये एका फसवणुकीच्या गुन्हात मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झालं होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आज कोर्टात हजर झाले. कोर्टात जाण्याआधी मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. तर या प्रकरणात  जरांगे पाटील यांचे अटक वॉरंट रद्द केले आहेत. ५०० रूपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा.. पोर्श कारअपघात प्रकरणी सुनील टिंगेर अडचणीत, जगदीश मुळीकांची प्रकरणावर चुप्पी का ? 

दरम्यान, २०१३ साली जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम १५६ ( ३ ) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हामध्ये जरांगे पाटील यांना अटकपुर्व जामीन देखील मिळालेला होता. या प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात आज सुनावणी झाली.

READ ALSO :

हेही वाचा..“राज्यसभा सोडा, लोकसभेची उमेदवारी मी नाकारली”, नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचं पुर्णविराम 

हेही वाचा…घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?” 

हेही वाचा…“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा 

हेही वाचा..नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन