IMPIMP
Sharad Pawar Vs Amol Kolhe Sharad Pawar Vs Amol Kolhe

अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. शरद पवार गटाने त्यांच्याकडे लोकसभेतील प्रतोद पद देण्यात आल्याची माहिती त्यांनी एक्सवर दिली आहे. याबाबत अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांचे आभार देखील मानले आहेत.

हेही वाचा…“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल 

अमोल कोल्हे यांनी आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये असं म्हटलंय की, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले. ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.

हेही वाचा..पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..” 

पुढे बोलतांना ते असंपण म्हणाले की,  लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार !

READ ALSO :

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

हेही वाचा..राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

हेही वाचा..इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

हेही वाचा..“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

हेही वाचा..मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

Leave a Reply