IMPIMP

टायगर अभी जिंदा है..! चंद्रपुर जिल्ह्यात बडे नेते लागले विधानसभेच्या तयारीला

चंद्रपुर : विधानसभा निवडणुकीला आजपासून तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. १ नोव्हेंबर रोजी दिवाळी असल्याने दिवाळीचे फटाके फुटण्यापुर्वीच निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा सक्रीय झाले आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार तयारीला लागले आहेत. उद्घाटन, भूमिपुजन, लोकार्पण, मेळावे, मोर्चा, आंदोलने, गुणवतं विद्यार्थ्यांचे सत्कार तथा अन्य विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा..हडपसरमध्ये शरद पवारांचा उमेदवार फिक्स, मात्र कॉंग्रेस अन् ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर वाद चिघळणार 

येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. वडेट्टीवार ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाअतंर्गत येणाऱ्या तालुक्यांमध्ये उद्घाटन, भूमिपुजन, गुणवंतांचे सत्कार सोहळे घेऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मतदारांच्या भेटी घेत आहेत. आचारसंहितेपूर्वीच मतदारांना रसद पुरवण्याचे कामही सुरू झाले आहे.

हेही वाचा…विधानसभेत पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरण बदलणार, शहरात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी 

पालकमंत्री मुनगंटीवार बल्लारपूर मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर १५ दिवस मुंबई, दिल्लीत भाजपच्या चिंतन बैठकींना हजेरी लावल्यानंतर मुनगंटीवार यांनी बल्लारपुरात सभा घेऊन ‘टायगर अभी जिंदा है,’ असा इशारा विरोधकांना दिला. त्यांनी संपूर्ण बल्लारपूर मतदारसंघ पिंजून काढण्याची व्यूहरचना आखली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..हडपसरमध्ये शरद पवारांचा उमेदवार फिक्स, मात्र कॉंग्रेस अन् ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर वाद चिघळणार 

हेही वाचा…राहुल गांधींनाही पंढरपुरच्या विठ्ठलाची ओढ, वारकऱ्यांसोबत दिंडीत पायी चालणार ? 

हेही वाचा…महाविकास आघाडीत कॉंग्रेसचच मोठा भाऊ, विधानसभेत कॉंग्रेस १०० जागा लढवणार ? इतरांना किती ? 

हेही वाचा…“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन”, उद्धव ठाकरेंनी डिवचलं 

हेही वाचा..मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी निवडणुक लढणार, विधानसभेसाठी मेगा प्लॅन ठरला 

Leave a Reply