मुंबई : राज्यतल्या करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे तर, दुसरीकडे आरोग्य यंत्रणांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी, राज्यातील १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच नंतर त्यांनी ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांनाही अशाचप्रकारे पास करण्याचा निर्णय देखील जाहीर केला, मात्र १० वी आणि १२ वीच्या परीक्षांबाबत अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे, विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
तसेच, अनेक पालक संघटनांनी राज्य सरकारला आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी लावून धरली होती. यातच आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील, राज्यतल्या करोना परिस्थितीच्या अत्यंत बिकट पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांच्या भविष्याचा आणि हिताचा विचार करून, राज्य सरकारला या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
दरम्यान, आज मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वानुमते, १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच या परीक्षा अनुक्रमे जुलै आणि मे महिन्याच्या शेवटी घेतल्या जातील, असेही त्यांनी ट्विटरवर पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) pic.twitter.com/cjeRZAT7ux
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021
यावेळी शिक्षणमंत्र्यांनी हे देखील नमूद केले की राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय, राज्यातल्या इतर बोर्डांनीही स्वीकारावा आणि राज्य सरकार आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी त्यांनी आयसीएसई, सीबीएसई, आयबी, केम्ब्रिज बोर्ड यांना केली आहे.
We'll also be writing to the CBSE, ICSE, IB, Cambridge boards, requesting them to reconsider their exams dates. (5/5)
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021