दिंडोरी : गेल्या अनेक दिवसापासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. दिंडोरी मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांना संधी देण्यात आली आहे. अशातच याठिकाणी मॉक्सवादी कमिन्युस्ट पार्टीचे नेते आणि माजी आमदार जे. पी. गावित यांनी आपला अपक्ष उमेदवारी मागे घेतल्याने महाविकास आघाडीला सुखद धक्का बसला आहे.
हेही वाचा..“हा ‘ट्रेलर आहे अजून पिक्चर अभी बाकी है’”,सुनील तटकरेंनी विरोधकांना दिला इशारा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून जे.पी. गावित निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्याठिकाणी शरद पवारांनी भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर जे. पी. गावित नाराज झाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला. त्यासाठी जे. पी. गावित यांनी दिंडोरीत जाहीर सभा देखील घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये चिंता निर्माण झाली होती.
हेही वाचा..“थेट मुंबईहून आंतरवाली सराटी गाठत जय पवारांची जरांगे पाटलांशी भेट “राजकीय वर्तुळात चर्चा
अशातच आज जे. पी. गावित यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर जे. पी. गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशातच जे. पी. गावित यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल असा शब्द शरद पवारांनी दिला असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“नाहीतर एका झटक्यात ही जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही”
हेही वाचा…विदर्भातील १० च्या १० जागा आघाडी जिंकणार, नितीन गडकरींचा देखील पराभव होणार