बारामती : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवारांची बारामती मतदारसंघातील मिशन बंगल्यासमोर सांगता सभा होत आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवारांची मोरेगाव येथे जाहीर सभा होत आहे. दोन्ही सभेतून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. अशातच शरद पवारांच्या सभेत चहावाल्याचं दुकान फक्क साखरवालाच बंद करू शकतो. अशा आशायाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे येत्या ०४ जूनला बारामतीचा काय निकाल लागणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..“थेट मुंबईहून आंतरवाली सराटी गाठत जय पवारांची जरांगे पाटलांशी भेट “राजकीय वर्तुळात चर्चा
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर होत असलेल्या बारामतीच्या पवार विरूद्ध पवार लढतीकडे सगळ्याचं लक्ष आहे. एका बाजूला सुनेत्रा पवारांसाठी महायुतीचे सर्व नेत्यांनी सभा घेतली. तर दुसऱ्या बाजूला सुळेंसाठी महाविकास आघाडीतील अनेक नेते बारामतीत येऊन गेलेत. अशातच आज होत असलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली.
हेही वाचा…नितीन गडकरींनी सुनील तटकरेंना पाठवल्या खास शुभेच्छा, म्हणाले..
दरम्यान, आज होत असलेल्या सुप्रिया सुळेंच्या सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर झालेत. यावेळी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. तर सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेला बारामती मतदारसंघातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
READ ALSO :
हेही वाचा..“नाहीतर एका झटक्यात ही जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही”
हेही वाचा…विदर्भातील १० च्या १० जागा आघाडी जिंकणार, नितीन गडकरींचा देखील पराभव होणार
हेही वाचा..“हा ‘ट्रेलर आहे अजून पिक्चर अभी बाकी है’”,सुनील तटकरेंनी विरोधकांना दिला इशारा