मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार आहे. पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, कोरोना संकटात व्हर्च्युअल प्रचारावर भर दिला जात आहे. भाजपकडून देखील जोरदार प्रचार केला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या देखील 8 व्हर्च्युअल सभा होणार असून, यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
कोरोना संकटात रॅली व थेट प्रचारसभा घेता येत नसल्याने पक्ष सोशल मीडिया व व्हर्च्युअल सभांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहे. पंतप्रधान मोदींच्या 8 सभांसाठी भाजपच्या सोशल मीडियाने तयारी केली असून, स्मार्ट फोनसह पक्षाचे चार लाख कार्यकर्ते आणि 10 हजार सोशल मीडिया कंमाडोज सज्ज झाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या व्हर्च्युअल सभा घराघरात पोहचवण्यासाठी भाजपने तयारी केली आहे.
दरम्यान, बिहारमध्ये 27 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबरला दुसऱ्या आणि 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.