मुंबई : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भारतीय जनता पक्षाने केलेला दावा, उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या पदावर काँग्रेसचे रवी राजाच राहणार हे स्पष्ट झाले आहे.
मात्र आता भाजपने न्यायालयात दाद मागितली. मुंबई उच्च न्यायालयानेही भाजपचा हा दावा नाकारला असून कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते पद कायम ठेवले आहे. या विरोधात आता भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगरसेवक आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली. दरम्यान, विरोधी पक्ष नेते पदासाठी मुंबई महापालिकेत काही दिवसांपासून वातावरण तापले आहे.
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. राज्यात युतीची सत्ता असली तरी महापालिकेत शिवसेना, भाजप एकत्र नव्हते. मात्र, भाजपने विरोधी पक्ष नेते पदावरही दावा सांगितला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या कॉंग्रेस पक्षाला हे पद मिळाले. मात्र, राज्यात महाआघाडी स्थापन झाल्यावर भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळून लावला.
Read Also
दसरा मेळाव्याचे यंदा काय होणार ? CM ठाकरे करू शकतात ‘या’ पर्यायाचा वापरhttps://t.co/oykVTQWMmi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020