मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुलस्वामिनी असलेल्या वेहेरगाव येथील आई एकविरा देवीच्या मंदिराजवळ आज मावळ तालुका भाजपच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद आहेत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी आज भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलने करण्यात आली.
गेल्या अनेक महिन्यांपासून एकविरा देवीचे मंदिर बंद असल्यामुळे मंदिर आणि भक्तांवर अवलंबून असलेले अनेक छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे या संबंधी व्यवसाय करणाऱ्यांवर कुटुंब चालवणे अवघड होत चालले आहे. त्याच अनुषंगाने भाजपच्या वतीने आज हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने तात्काळ मंदिर खुली करावीत अशी मागणी यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे व महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे यांनी केली.
राज्य सरकारने दारूची दुकाने सुरु केलीत मात्र अद्याप मंदिर सुरु करण्यात आलेली नाही. मंदिर बंद ठेऊन सरकारला नेमकं काय साध्य करायचे आहे. असा सवाल यावेळी आंदोलन कर्त्यांच्या वतीने विचारण्यात आला.
ALSO READ THIS
महाविकास आघाडी म्हणजे देवावर विश्वास नसलेली ‘भूत’ !https://t.co/DMsZtMF73D@ChDadaPatil @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 29, 2020