मुंबई – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केले आहे, मात्र त्यासाठी “मुंबई मा जिलेबी फाफडो, उद्धव ठाकरे आपडो” असं घोषवाक्य तयार करण्यात आलं, त्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात राजकारण रंगलं आहे. उद्धव ठाकरे सरकार आपडो नाही तर थापडो सरकार असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर मिळत असलेल्या थपडा आणि जनतेला राज्यातील आघाडी सरकारांकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे असा टोला त्यांनी लगावला.
हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार
न्यायालयाकडून सरकारमधील मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर मिळत असलेल्या थपडा आणि जनतेला राज्यातील सरकारांकडून मिळत असलेल्या थापा पहाता हे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे. -१
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 8, 2021
न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ते मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती संख्या वाढतेच आहे. मंत्री विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशीर ठरविण्याचा आलेला निर्णय ताजा आहे, त्याशिवाय पदवी परिक्षा, ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक, मेट्रो कारशेड, अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात न्यायालयाकडून सरकारला मिळालेल्या थपडा तसेच मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आलेले अपयश ही सुध्दा थप्पडच आहे असंही भाजपाने सांगितले.
न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ते मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती संख्या वाढतेच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड -३
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 8, 2021
एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र सरकारच्या फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात वारेमाप सवलत देण्याच्या सरकारकडून फक्त थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकऱी धार्जिण्या करू, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा जनतेला देत असलेल्या थापांची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच आहे असा चिमटाही केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला काढला आहे.
मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा जनतेला देत असलेल्या थापांची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 8, 2021