मुलाखतकार राजू परुळेकर यांनी काही दिवसांपुर्वी द इंन्साडरसाठी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखती विशेष गाजल्या होत्या. त्यानंतर आता परुळेकर यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर परुळेकरांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या टीझरमध्ये आशिष शेलार शिवसेनेवर सडकून टीका करताना दिसत आहे. शिवसेनेमुळे सत्ता गमवावी लागल्याने त्यांच्यावर आरोप करता का ? असा प्रश्न विचारला असता आशिष शेलार म्हणाले की, सत्तेत एकत्र असताना शिवसेनेच्या फाजील आत्मविश्वासामुळे महानगरपालिकेतील युती तुटली होती.
Good morning #Collage #TheInsider
With @ShelarAshish
Coming soon…झलक👇 pic.twitter.com/PconnM1GyU— Raju Parulekar (@rajuparulekar) August 19, 2020
मुंबई महानगरपालिकेची सत्ता एकाच कुटुंबाकडे गेली असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. राज्यात किंवा केंद्रात या पैकी कोठे काम करायचे असे मी काही निश्चित ठरवलेले नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ही संपुर्ण मुलाखत लवकरच द इंन्साइडर या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.