मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापू लागला आहे. त्याच अनुषंगाने आज भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मात्र ओबीसी आरक्षणास धक्का न लावता अशा मागणीचे निवेदन यावेळी भाजपच्या आमदार मनिषा चौधरी तसेच माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले.
तसेच यावेळी ओबीसींच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी मागणी देखील भाजपकडून निवेदनाद्वारे करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशा मागणीचा उल्लेख दिसून आला.
नेमक्या कोणत्या मागण्या यावेळी करण्यात आल्या
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा.
ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ओबीसी प्रशासन भवनची निर्मिती करण्यात यावी.
ओबीसी समाजाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी तातडीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
कोरोना महामारीमुळे उद्धवस्त झालेल्या बलुतेदाराच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा व्हावी.
ओबीसी विद्दयार्थ्यांच्या फी संदर्भात सहा महिन्यांची मुदत देण्यात यावी.
सरकारी घरकुल योजनेमध्ये ओबीसी व्यक्तींना खावटी योजने अंतर्गत लाभ मिळावा.
अशा विविध मागण्यांसाठी आमदार मनीषा चौधरी तसेच माजी आमदार योगेश टिळेकर यांनी राज्यपालांना निवेदन दिले. यावेळी कुणबी सेवा प्रमुख विश्वनाथ पाटील हे देखील उपस्थित होते.
आज राजभवनात मा. राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी जी यांची भेट घेतली, मराठा समाजाला आरक्षण मिळणेबाबत तसेच मूळ ओबीसी आरक्षणास धक्का न लावता ओबीसींच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होणेबाबत राज्यपालांना निवेदन दिले तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर आम्ही चर्चा केली.@maha_governor pic.twitter.com/QLRCXsc07V
— Manisha Chaudhary (@manishaBJP) September 27, 2020
आज राजभवन येथे जाऊन माननीय राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन ओबीसी समाज्याच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा केली तसेच ओबीसींच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होणेबाबत राज्यपालांना निवेदन दिले. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4India @manishaBJP pic.twitter.com/uVhyZSLSsQ
— Yogesh Tilekar (@iYogeshTilekar) September 27, 2020
Read Also
संजय राऊत आणि शरद पवार यांच्याकडून शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले…https://t.co/PvwCXiep3C#SanjayRaut #Shivsena #SharadPawar #ncp
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020