मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. त्यांना आज कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
तसेच या ईडी प्रकरणावरून संजय राऊत यांनी, ‘माझ्याशी पंगा घेऊ नका. मी नंगा माणूस आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. याच प्रतिक्रियेवरून माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.”
संज्या सारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला 'नागडं' कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ' मै नंगा हू'. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 29, 2020
याचसोबत, “शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे”, असंही ट्विट करत त्यांनी शिवसेनेलाही कोपरखळी मारली.
शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले “आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल”. देशा बाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 29, 2020