राम मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ आज उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक घटनेनं देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे मात्र याच आनंदाच्या भरात भाजप नेते राम कदम यांच्याकडून एक चूक घडली आहे. कदमांनी आपल्या ट्विटरवरून फेक फोटो शेअर केल्यानं नेटिझन्सकडून आता त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
राम कदमांनी शेअर केलेल्या या फोटोत न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर लावलेल्या बिलबोर्ड्समध्ये भगवान रामचा फोटो दिसत आहे. तसेच अन्य एका ठिकाणी देखील भगवान श्रीराम यांचा फोटो लावण्यात आला आहे. यात भाजपचे आमदार राम कदम यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्त today’s Proud moment या शीर्षकानं प्रभू रामचंद्राचा फोटो ट्वीट केला आहे. सोबत #Times_Square #USA #AyodhyaBhoomipoojan #ModiHaiTohMumkinHai असे हॅशटॅगही दिले आहेत. यावरून आमदार राम कदम ट्रोल झाले आहेत.
आता तिकडे रात्र असेल ना….कसे काय असले एडिट फोटो आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून शेयर करू शकता..’, ‘इन लोगो को फोटोशोप भी थिक से नही आता’, ‘दाजी आता तिकडे जवळपास सकाळचे 5.30 वाजलेत आणि ही पोस्ट 1 तास आधीची आहे, म्हणजे रात्री 4-4.30 ला तिकडे येवढा प्रकाश आणि वर्दळ असते’, ‘राम कदम साहेब शेजारी ती bottle दिसतेय ना कशाची आहे हे सांगायची गरज नाही, हा फोटो खोटा आहे. कृपया आमच्या भावना दुखावू नका डिलीट करा ती पोस्ट आधी’, अस काही नेटिझन्सनी म्हटले आहे. दरम्यान, राम कदमांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक फॅक्ट चेक वेबसाईट्सने फोटोची सत्यता पडताळून संबंधीत फोटो फेक असल्याची माहिती दिली आहे.