नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तराखंड दौऱ्यादरम्यान त्या एका यात्रेला गेल्या होत्या, यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी स्वतःला ऋषिकेश आणि दरिद्वारच्या दरम्यान वंदे मातरम कुंजमध्ये स्वत:ला क्वारंटाईन केले आहे.
२) मैंने हिमालय में कोविड के सभी विधिनिषेध एवं सोशल डिस्टंस का पालन किया फिर भी मै अभी क़ोरोना पोज़िटिव निकली हू ।
— Uma Bharti (@umasribharti) September 26, 2020
उमा भारती यांनी ट्विट करत माहिती दिली की, “मी केदारनाथ दर्शनानंतर प्रशासनाकडे आग्रह करत कोरोना चाचणी पथकाला बोलावले. कारण मला तीन दिवस ताप होता. मी हिमालयात सोशल डिस्टन्सिगसह सर्व नियमांचे पालन केले. पण तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे.
४) मेरे इस ट्वीट को जो भी मेरे संपर्क में आये हुए भाई- बहन पढ़े या उन्हें जानकारी हो जाये उन सबसे मेरी अपील है की वो अपनी कोरोना टेस्ट करवाये एवं सावधानी बरते ।
— Uma Bharti (@umasribharti) September 26, 2020
मी हरिद्वार आणि ऋषिकेषच्यामध्ये असलेल्या वंदे मातरम कुंजमध्ये क्वारंटाईन आहे. हे माझ्या कुटुंबासारखेच आहे. चार दिवसानंतर पुन्हा मी तपासणी करणार आहे आणि परिस्थिती अशीच असली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेऊ. माझ्या संपर्कात आलेल्या इतरांनी सावधानी बाळगा आणि आपली कोरोना चाचणी करा, असे आवाहन त्यांनी केले.