IMPIMP
BJP misbehaved at the Center in the case of Shiv Sena said Shrirang Barane BJP misbehaved at the Center in the case of Shiv Sena said Shrirang Barane

“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ दिली. एनडीएमधील जवळपास ७२ खासदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ दिली. यातच राज्यातून भाजपचे चार आणि एक शिवसेना शिंदे गट आणि एक आठवले गट यांना मंत्री पद मिळालं आहे. यावरून शिवसेना शिंदे गटातील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी कॅबिनेट मंत्रीपद न दिल्याने खदखद व्यक्त केली आहे.

हेही वाचा…“आम्ही देखील त्यांच्या शब्दावर राहू, थोडा धीर ठेवू”, कॅबिनेट मंत्री न मिळाल्यानंतर पटेलांचं विधान 

यावेळी श्रीरंग बारणे म्हणाले की, शिवसेना पक्षाला केंद्रात एक कॅबिनेट पद आणि एक राज्य मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसं काही झालं नाही. शिवसेना हा पक्ष भाजपचा अतिशय जुना सहकारी पक्ष आहे. एनडीएमध्ये सर्वात जास्त पक्ष म्हणून शिवसेनेचे एकूण सात खासदार निवडून आलेत. पाच खासदार चिराग पासवान यांचे निवडून गेलेत. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. तर शिवसेनेला पक्षाला फक्त एक राज्यमंत्री पद देण्यात आलं. अशी खंत देखील त्यांनी व्यक्त करून दाखविली आहे. हा कुठेतरी दुजाभाव शिवसेनेच्याबाबतीत होत आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा…Chandrakant Patil Video | वृक्ष लागवडीत चंद्रकांत दादांनी रचला नवा इतिहास, यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ३० कॅबिनेट मंत्री, ०५ स्वातंत्र प्रभारी, तर ३६ राज्यमंत्री पद असा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. या मंत्र्यांना आज खातेवाटप होण्याची शक्यता आहे. भाजपने सर्वाधिक  ६१ खाती स्वत: कडे ठेवलीत तर मित्र पक्षाच्या वाट्याला फक्त ११ खाती देण्यात आलीत. यातच या मंत्रिमंडळात तब्बल ३३ नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन 

हेही वाचा..मोठी बातमी…! “पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींचा पहिलाच शेतकऱ्यांसाठी निर्णय” 

हेही वाचा…“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट 

हेही वाचा…राज्यात आघाडीचंं वारं वाहू लागलं..! एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटातील ४० आमदारांची लवकरच घरवापरी

हेही वाचा…राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान