मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली होती असे स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते मात्र पवार यांना अशा प्रकारची कोणतीही नोटीस न आल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिल्यानंतर भाजपचे खासदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता.अशी कोणतीही नोटिस पाठवली नसल्याचे आज इनकम टॅक्स विभागाने स्पष्ट केले आहे असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. तसेच सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस खरी आहे असा उपरोधिक टोला यावेळी अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता.
अशी कोणतीही नोटिस पाठवली नसल्याचे आज इनकम टॅक्स विभागाने स्पष्ट केले.
सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस. pic.twitter.com/KDaRt5eMFL— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 23, 2020
काय म्हणाले होते नेमकं शरद पवार
संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली आहे. त्याचं उत्तर लवकरच मी देईन, कारण उत्तर दिलं नाही तर दिवसाला 10 हजारांचा दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे असे देखील शरद पवार यांनी यायला सांगितले.