पुणे (पिंपरी) : आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. मात्र या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. यानंतर राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनीकडून योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची घोषणा करताच योगीजीं या घोषणेसाठी धन्यवाद अशा आशयाचे ट्विट करत आमदार महेश लांडगे यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्तानची प्रेरणा आहेत असे देखील लांडगे ट्विटमध्ये म्हंटले आहेत.
योगी जी इस घोषणा के लिए धन्यवाद। छत्रपति शिवाजी महाराज हिन्दुस्तान की प्रेरणा है।
जय शिवाजी जय भवानी 🚩 @myogiadityanath https://t.co/VyRQSea6jA— Mahesh Kisan Landge (@maheshklandge) September 14, 2020
आग्रा येथील ताजमहाल या वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचं बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
Read Also
सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,’त्या’अधिकाऱ्याची राज्यपालांकडे मागणीhttps://t.co/xpl3wWBwup@BSKoshyari @BhatkhalkarA @CMOMaharashtra #madansharma
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 15, 2020