सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार तासांपूर्वी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अजूनही शरद पवार यांना शुभेच्छा देणारे एकही ट्विट केले नसल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ट्विटरवरुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पण, राहुल गांधी यांनी अजूनही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकही ट्विट केले नाही, असा दावा नितेश राणेंनी केला. राहुल गांधींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे ट्विट केले नव्हते. हा धागा पकडत ही कसली महा विकास आघाडी, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी 17 नोव्हेंबरला राहुल गांधींनी अभिवादन करणारे ट्विट केले का?, असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला होता.
Hon PM Modiji gave birthday wishes thru twitter to Hon Pawar saheb 4 hrs back..
n not a single tweet from Rahulji on Pawar Saheb’s bday yet..
No tweet on Hon Balasahebs birth anniversary too..
Maha Vikas Agadhi?— nitesh rane (@NiteshNRane) December 12, 2020
भाजप आमदार नितेश राणेंनी नरेंद्र मोदींनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र राहुल गांधींनी शुभेच्छा देणारे एकही ट्विट केले नसल्याचे म्हटले. नितेश राणेंच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक पेज आणि ट्विटरवरील अकाऊंट पाहिले असता राहुल गांधींनी शुभेच्छा दिल्या नसल्याचे स्पष्ट झाले. नितेश राणेंनी यानिमित्ताने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.