सोलापूर : राज्याचे उर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी ट्विटरवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून निशाणा साधला होता. योगीराजमध्ये गुंड निडर झाले आहेत का ? गुंडांना योगी आदित्यनाथ संरक्षण देत आहेत का ? असा सवाल त्यांनी विचारला होता. सोबतच त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या गुन्ह्यांच्या काही बातम्या देखील शेअर केल्या होत्या. यावरून आता माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी नितीन राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.
ह्याला म्हणतात दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही.@NitinRaut_INC https://t.co/DnJDQ2ljwU
— Ram Satpute (@RamVSatpute) September 23, 2020
ह्याला म्हणतात दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही, असे म्हणत राम सातपुते यांनी नितीन राऊत यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका दलित सरपंचाची हत्या करण्यात आल्यानंतर नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेशचा दौरा देखील केला होता.