कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. स्वत: अधिकृत फेसबुक पेजवरुन त्यांनी याबाबतची माहिती दिली.
“कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आज विलगीकरणात (होम क्वारंटाईन) जात आहे. तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, पुढील काही दिवस माझी प्रत्यक्ष भेट घेणे टाळावे,” असे आवाहन सुरेश धस यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन केलं आहे.
“अत्यावश्यक कामासाठी मी मोबाईलवर 24 तास उपलब्ध असेल. माझे सहकारी देखील सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतील. आपण देखील आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरातच रहा, सुरक्षित रहा,” असेही ते म्हणाले.