मुंबई : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कोकण विभाग व मुंबई विभाग प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष यांची बैठक आमदार मनीषा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी कोकण विभाग व मुंबई विभाग प्रदेश पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण करण्यात आले व कोकण विभागातील जिल्हा प्रभारीची नियुक्ती करण्यात आली तसेच पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कोकण विभाग व मुंबई विभाग प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष यांची बैठक आमदार सौ.मनीषा ताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.@BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @manishaBJP @BJYMinMH pic.twitter.com/mBdnAqJI6N
— Yogesh Tilekar (@iYogeshTilekar) September 27, 2020
ओबीसी समाजबाबतचे विविध प्रश्न यावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते तसेच यावेळी उपस्थित प्रदेश पदाधिकारी हरिशचंद्र भोईर, मनोज भुजबळ, अनिल पंडित, वनिता लोंढे, योगिता पाटील, लताताई पगारे, हेमंत भास्कर, अनिल महाजन, अतुल दुधाळ व भाजपा ओबीसी मोर्चा कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.
Read Also
बॅनर,बुके,केक यांच्यावर खर्च करण्यापेक्षा… रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांकडे मागितले ‘हे’ गिफ्टhttps://t.co/bB9gi0zSL7#RohitPawar #NCP #RohitPawarBirthday
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020