नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन केले आहे. ते काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी 9 आणि 10 डिसेंबरला रोड शो आणि रॅली केली होती.
जेपी नड्डा यांनी ट्विट करत माहिती दिली की, कोरोनाची सुरुवातीची लक्षण जाणवल्याने मी टेस्ट करून घेतली. त्यात माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. माझी तब्येत चांगली आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने मी होम आयसोलेशनमध्ये असून डॉक्टरांच्या सर्व सूचनांचं पालन करत आहेत.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है, डॉक्टर्स की सलाह पर होम आइसोलेशन में सभी दिशा- निर्देशो का पालन कर रहा हूँ। मेरा अनुरोध है, जो भी लोग गत कुछ दिनों में संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 13, 2020
गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची टेस्ट करून घ्यावी आणि स्वत:ला क्वॉरंटाईन करून घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर आता नड्डा यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी मुंबईत येणार होते. मात्र आता त्यांनी हा दौराही पुढे ढकलला आहे.