नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबर रोजी 70 वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 70 ठिकाणी 70 कार्यक्रम करण्याचा भाजपचा विचार आहे.
याशिवाय मोदींना किमान दहा लाख लोकांनी सेल्फी व्हिडिओ चित्रित करून शुभेच्छा द्याव्यात यासाठी भाजपने मोहीम हाती घेतली आहे. भाजपच्या आयटी विभागाने या उपक्रमाची आखणी केली आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार तसेच स्थानिक नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विशेष ‘हॅपी बर्थडे मोदीजी’ हा हॅशटॅग देखील तयार करण्यात आलेला आहे. देशासह-परदेशातही मोदींना मानणारी लोक आहेत, त्यामुळे विविध ठिकाणांवरील लोक या हॅशटॅगचा वापर करून शुभेच्छा देताना दिसाव्यात हा यामागचा उद्देश आहे.