महाराष्ट्रावर शिवसेनाचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शरद पवारांना यावरच प्रतिक्रिया विचारली असता, ‘हे भाषण मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकतो आहे’, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना काढलेल्या चिमट्यानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी सेनेला डिवचलं आहे. ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, असं खोचक ट्विट आमदार अतुल भातखळकर यांनी केल आहे.
अतुल भातखळकर यांचे ट्विट –
शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार… हा घ्या घरचा आहेर… सोनाराने कान टोचले ते बरं झालं…