मुंबई : मोदी हा देशाचे पंतप्रधान नसून दारुड्या आहे अशा वादग्रस्त शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका टीका केली होती आंबेडकरांच्या या टीकेला आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार उत्तर देण्यात आले आहे. ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्यांच्याच नातवाने असे शब्द वापरावे हे दुर्दैव आहे अशा आशयाचे ट्विट भाजप आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
सोलापूर : मोदी हा देशाचे पंतप्रधान नसून दारुड्या आहे. तो देश विकायला निघाला आहे, अशा वादग्रस्त शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. प्रकाश आंबेडकर सोलापुरातील सांगवी बुद्रूक येथे पाहणी दौरा करण्यासाठी गेले होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा उल्लेख केला होता.
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी काहीशी अवस्था काही लोकांची झाली आहे. त्यामुळे ते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन देशाच्या माननीय पंतप्रधानांवर टिका करत आहे.अशा आशयाचे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या देशाच्या पंतप्रधानांबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे देशाचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
काय म्हणालेत होते नेमकं प्रकाश आंबेडकर यावेळी
पंतप्रधान मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून दारुड्या आहे, देश विकायला निघाले आहेत. रेल्वे, विमान आदी नफ्यातील सुविधांचे खासगीकरण सुरू आहे. गरज भागली नाही म्हणून विक्रीला काढत असल्याप्रणाने आहे. ज्याप्रमाणे एखादा दारुडा दारु पिण्यासाठी बायकोला मारतो नंतर दारुसाठी घर विकतो त्याप्रमाणे मोदी आहेत.
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी काहीशी अवस्था काही लोकांची झाली आहे. त्यामुळे ते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन देशाच्या माननीय पंतप्रधानांवर टिका करत आहे. pic.twitter.com/ylOrwGjxFE
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 21, 2020
Read Also
‘मुख्यमंत्री घराबाहेर बाहेर पडले म्हणजे कोरोना संपला’; संदीप देशपांडेची टीका https://t.co/oSEky75vn1 @SandeepDadarMNS @CMOMaharashtra @OfficeofUT @mnsadhikrut
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020