नवीदिल्ली : पश्चिम बंगलामधील आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपकडून ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्यास येत असल्याचे दिसून येत आहे. याच पर्शवभूमीवर पश्चिम बंगाल मधील ममता यांचे सरकार हिंदु विरोधी असल्याची टीका भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली आहे .
ममता यांच्यावर टीका करताना नड्डा म्हणाले,”अयोध्येतील राम जन्मभूमी सोहळा संपूर्ण देश होता त्यावेळी ममता यांनी लॉकडाऊनची घोषणा केली त्यामुळे राज्यातील नागरिकांना हा सोहळा पाहता आला नाही किंवा साजरा करता आला नाही मात्र हा लॉकडाऊन बकरी ईदमुळे मागे घेण्यात आला यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते. राज्यात आतापर्यंत भाजपच्या 100 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत यावरही नड्डा यांनी बोट ठेवले.
पश्चिम बंगाल भाजपने काही नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली.या निवडीनंतर नड्डा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मार्गदर्शन केले तेव्हा त्यांनी मामा बनर्जींवर निशाण साधला
Read Also
शिवसेना आता सोनिया – सेना बनली आहे, कंगनाकडून ट्विटर वॉर सुरुचhttps://t.co/DGYwnhDfMC@KanganaTeam @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 10, 2020