पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जनता दल यूनायटेड यांची युती निश्चित झाली आहे. जेडीयू 122 तर भाजपा 121 जागांवर ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्या पाटणा येथे युती, जागा आणि उमेदवारांची घोषणा होईल. मांझी यांना पाच ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होणार आहे .
Read Also :
हाथरसच्या पीडित कुटुंबाला भेटल्यानंतर संजय सिंह यांच्यावर अज्ञात व्यक्तीने फेकली शाई https://t.co/iiXjxak4Mf @AamAadmiParty @ArvindKejriwal
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020