कोलकाता : केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्या विविध मुद्यावरून संघर्ष सुरू असतानाच भाजपला आता मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर भाजपला हादरा बसणार? देशातील महत्त्वाच्या राज्यात राजकीय उलथापालथीची शक्यता. ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांच्यासह भाजपचे ३३ आमदार संपर्कात असल्याची चर्चा, तृनमुल काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे.
भाजपचे जेष्ठ नेते मुकूल रॉय यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना ममता बॅनर्जी यांच्या भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेतली असल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून मुकूल रॉय यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. मुकूल रॉय यांची समजूत पंतप्रधान मोदींनी काढचल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीनंतर पंश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय उलधापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुकूल रॉय हे एकेकाळी ममता बॅनर्जीचे उजवे हात असल्याचे मानले जात होते. परंतू निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, शिवाय त्यांना भाजपमध्ये मोठे पद देखिल देण्यात आले होते. निवडणुकीत ते स्वत: निवडूण आले. मात्र त्यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत पं. बंगालच्या नव्या सरकारबद्दल सहानुभूती दाखलवली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुकूल रॉय यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने त्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान ममता बॅनर्जीचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली असल्याने राजकीय वर्तूळात खळबळ माजली आहे.