IMPIMP
BJP's list for Legislative Council announced, 'these' five people got opportunity from BJP BJP's list for Legislative Council announced, 'these' five people got opportunity from BJP

“विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर..! ‘या’ पाच जणांना मिळाली भाजपकडून संधी

मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच जणांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके यांच्यासह अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नाव देखील चर्चेत होतं. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या पाच नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

हेही वाचा..‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा! 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागा येत्या २७ जुलै रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांवर विधानसभा सदस्यांच्या मतदानावरून जागा भरण्यात येणार आहेत. या निवडणुकीचा निकाल आणि मतमोजणी १२ जुलै रोजी पार पडणार आहे. यात विधानसभा सदस्यांच्या संख्याबळानुसार भाजपच्या ५ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २ अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ आणि महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी होऊ शकतात.

हेही वाचा..‘ती’ स्थिती विधानसभेत झाली तर राज्यात सत्ता बदलणारच ; शरद पवारांनी सांगितलं राजकीय गणित 

लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार अशी आधीच चर्चा होती. त्यानंतर भाजपकडून पुन्हा महादेव जानकर यांना संधी दिली जाईल असं वाटत असतांना भाजपने सदाभाऊ खोतांना संधी दिली आहे. यातच भाजपकडून चित्रा वाघ यांचं नाव देखील चर्चेत होतं. परंतु भाजपने त्यांना अद्याप संधी दिलेली नाहीय. यातच योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांच्यावर भाजपने विश्वास टाकला असून त्यांना विधान परिषदेसाठी संधी दिलीय.

READ ALSO :

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

Leave a Reply