IMPIMP

भाजपचा बालेकिल्ला शरद पवारांच्या शिलेदाराकडून उद्ध्वस्त , दिंडोरीत भास्कर भगरे विजयी

नाशिक : दिंडोरी लोकसभेतुन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा विजय झाला आहे. साधर्म्य असलेल्या पिपाणी चिन्हामुळे आणि भगरे आडनावामुळे त्यांचे ८८ हजार पेक्षा अधिक मतांच नुकसान झाले. अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना ही मत मिळाली आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे जवळपास एक लाख 70 हजार 59 मताने विजयी झालेत. जवळपास पंधरा वर्षानंतर भास्कर भगरे यांनी भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त करत भारती पवार यांच्यावरती मोठा विजय मिळवला आहे. यामध्ये भारती पवार यांना चार लाख 35 हजार 514 मत पडले आहेत तर भास्कर भगरे यांना पाच लाख 42 हजार 5673 इतकी मतं पडलेत. त्यामुळे भास्कर भगरे या ठिकाणी झाले आहेत.

यातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे असे नाम साधर्म्य असलेले बापू सदू भगरे यांना शरद पवारांनी गटातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावामुळे त्यांना 96 हजार 626 इतकी मत पडले परंतु या ठिकाणी भास्कर भगरे यांना जनतेने पहिल्यांदाच निवडून दिले.