IMPIMP
supriya sule supriya sule

“१० एकर शेतीतून तब्बल ११३ कोटींची वांगी पिकविणाऱ्या..,” भाजपचा सुप्रिया सुळेंना टोला

पुणे : लाडकी बहिण योजनेची मी स्वत : माहिती घेतली आहे. १५०० रूपयांत किती रेशन येते याची अभ्यास केला आहे. या योजनेचं स्वागत करते. परंतु १५०० रूपयांत आमच्या महिला भगिनींना खरेच किती दिलासा मिळणार ? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यावरून आता भाजपने सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा…“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

भाजपच्या एक्स ट्विटर हॅंडलवर असं म्हटलं आहे की, १० एकर शेतीतून तब्बल ११३ कोटींची वांगी पिकविणाऱ्या महाराष्ट्राच्या वांगी उत्पादक ताईंना लाडकी बहिण योजनेचा त्रास होणे स्वाभाविकच आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या सुप्रिया सुळे लाडकी बहिण योजनेची खिल्ली उडवत असताना विसरल्या की राज्यातील महिला स्वकर्तृत्वाने सक्षम होत आहेत.

हेही वाचा…पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र 

सुप्रिया सुळे पुढे बोलतांना म्हणाल्या की, महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी आहे. १५०० रूपयांत कधी तुम्ही विचार केलाय का डाळ किती रूपयाला आहे ? कुणीतरी माझ्यासोबत किराणा मालाच्या दुकानात चला, महिनाभराचं सामान, भाजी खरेदीसाठी हे पुरण्यासारखं आहे का याचे उत्तर द्यावे. असा टोला देखील त्यांनी लगावला होता.

READ ALSO :

हेही वाचा…आता बच्चू कडूंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर, यवतमाळमध्ये एकच चर्चा 

हेही वाचा…“घेणं न देणं फक्त क्रेडीट घेण्याची घाई..!” राज्य सरकारच्या सत्कार सोहळ्याच्या बॅनरवरून भारतीय क्रिकेट संघ गायब 

हेही वाचा..जरांगे पाटलांच्या सुरक्षितेचा मुद्दा विधानसभेत, मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली महत्वाची माहिती 

हेही वाचा…“वर्ल्ड कप जसा मोदींनीच जिंकलाय, असा त्यांचा वावर”, विरोधकांची मोदींवर जहरी टिका 

हेही वाचा…कॉंग्रेसची ताकद वाढली, ‘सहा’ आमदारांनी मध्यरात्री कॉंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश 

Leave a Reply