IMPIMP
"BJP's survey spoiled our game", alleges a senior leader in the Grand Alliance Political war in the Grand Alliance "BJP's survey spoiled our game", alleges a senior leader in the Grand Alliance Political war in the Grand Alliance

“भाजपच्या सर्व्हेमुळे आमचा खेळ झाला”, महायुतीतील बड्या नेत्याचा आरोप, महायुतीत राजकीय युद्ध

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या चांगल्याच जिव्हारी लागला आहे. यातच आता महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. याआधी शिवसेना गटातील नेते आणि मंत्री शंभुराजे देसाई, संजय शिरसाट आणि रामदास कदम यांनी आरोप केले होते. यातच आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे.

हेही वाचा…बच्चू कडूंच्या जीवाला अज्ञातांकडून धोका, पोलिसांना लिहिलं ‘हे’ पत्र 

संजय गायकवाड म्हणाले की, आमच्या जागा अचानक बदलल्या गेल्या. ठाणे आणि अमरावतीवरही भाजपने दावा केला होता. त्यामुळे वातावरण खराब झालं होतं. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आम्ही ७ वरून १४ जागांवर नक्की गेलो असतो. आमच्या १५ पैकी १३ ते १४ जागा नक्की आल्या असत्या. हा सगळा खेळ केला. भाजपने सर्व्हे केला. त्यामुळे हे घडले. सर्व्हे केला होता. तर तो गुप्त ठेवायला हवा होता. सर्व्हे जाहीर का केला ? असा सवाल देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा…लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल, सरकारने घेतला हा निर्णय

दरम्यान, भाजपच्या लोकांमुळेच आम्हालाही आणि त्यांनाही लोकसभा निवडणुकीत फटका बसला, असं सांगतानाच आता आम्ही विधानसभेत १०० च्या पुढे जागा लढल्या पाहिजेत. एकनाथ शिंदे जर १०० जागा लढतील तर ८० जागा जिंकतील. असा दावा देखील त्यांनी केला.

READ ALSO :

हेही वाचा..राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय 

हेही वाचा..खडसेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी ? 

हेही वाचा..हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री गावात, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया… म्हणाले… 

हेही वाचा..“कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा,” हाकेंच्या मागणीला आता पंकजा मुंडेंचाही पाठिंबा

हेही वाचा…हाकेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार , मुंबईत आज सायंकाळी मोठी खलबतं 

Leave a Reply