विविध मागण्यासाठी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घ्यायची होती, पण त्यांची भेट घेऊ दिली जात नसल्यामुळे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट अब्दुल सत्तार यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच रास्ता रोको केला.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर हा प्रकार झाल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.
उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तीस टक्के माफ करावे, अशी मागणी यावेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी तात्काळ या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तब्बल 12 ते 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे या सर्व गदारोळात दरम्यान पोलिसांना आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचा आरोप विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Read This Also
आता एक पक्ष नाराज, पुढच्या काळात सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल ! विखेंची भविष्यवाणीhttps://t.co/MiZDt7SaQp@drsujayvikhe @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020